वाक येथून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर महसूलच्या ताब्यात

महा पोलीस न्यूज । भडगाव प्रतिनिधी । दि.२६ जानेवारीला सर्व अधिकारी कर्मचारी हे ध्वजारोहण करण्यात व्यस्त राहतील तेव्हड्यात आपण डंपर द्वारे अवैध वाळू वाहतूक करून घेऊ अशी युक्ती सुचलेल्या वाळू माफियाच्या डंपरवर आज सकाळीच तहसिलदार श्रीमती शितल सोलाट यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली.
भडगाव तालुक्यातील वाक येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज सकाळी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत वाळूचे डंपर जप्त करण्यात आले आहे.
कारवाई तहसिलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील ग्राम महसूल अधिकारी पाशा हलकारे, विजय पाटील, विलास शिंदे, सुनील मांडोले,समाधान हुल्लुळे, लोकेश महाजन, विशाल सुर्यवंशी आदींनी कारवाई केली. यावेळी वाळू माफिया ने हुज्जत घातली असता भडगाव पोलीसांना घटना स्थळी बोलावून डंपर ताब्यात घेतले. यावेळी पो. हे काँ. संजय पाटील, दत्ता पाटील, चालक संभाजी पाटील आदींनी पोलिस उपस्थित होते.