Other

फिजिओ गणेशा २०२६ भावूक वातावरणात निरोप

फिजिओ गणेशा २०२६ भावूक वातावरणात निरोप
जळगाव —डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे आयोजित ‘फिजिओ गणेशा २०२६’ या उत्सवाचा भावूक वातावरणात निरोप घेण्यात आला.
मेहरूण तलाव, जळगाव येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाच्या विसर्जनाने झाली.

महाविद्यालयात बाप्पाची मनोभावे पूजा व आरती करून विद्यार्थ्यांनी जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. ढोल-ताशांच्या गजरात, नृत्य आणि ‘गणपती बाप्पा मोरया’एक दोन तिन चार गणपतीचा जयजयकार,गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. आनंद आणि उत्साहाने भरलेल्या या क्षणांना निरोपाची वेळ येताच विदयार्थी भावूक झाले. लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने, भरलेल्या डोळ्यांनी आणि असंख्य आठवणींसह निरोप देण्यात आला.

हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेने, प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आणि प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे पार पाडला.गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! या जयघोषात फिजिओ गणेशा २०२६ ची भावपूर्ण सांगता झाली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button