Social

कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 800 ते 1000 ची घसरण !

नाशिक : लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये मंगळवारी लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपयांची घसरण झाली. श्रीलंका सरकारने कांदा आयात शुल्कात मोठी कपात केल्यामुळे त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा असताना दर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने बहुतांश शेतकऱ्यांनी माल बाजारात आणल्याने आवक वाढली असून, त्यामुळे दर कोसळल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील लासलगाव,

पिंपळगाव या प्रमुख बाजार समित्यांमध्ये गत आठवड्यात उन्हाळ काद्याला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. मंगळवारी त्यात मोठी घसरण झाली. एकीकडे ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने फवारणीचा खर्च वाढत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button