PoliticsSport

युवासेनेच्या बास्केटबॉल स्पर्धेत १२ संघांचा सहभाग; मुलांमध्ये पाचोरा, तर मुलींमध्ये नाशिक अव्वल

युवासेनेच्या बास्केटबॉल स्पर्धेत १२ संघांचा सहभाग; मुलांमध्ये पाचोरा, तर मुलींमध्ये नाशिक अव्वल

उत्तर महाराष्ट्रस्तरीय स्पर्धेत जळगाव, धुळे, नाशिक, अकोला व नंदुरबारच्या संघांचा सहभाग; चंद्रकांत खैरे यांची समारोपाला उपस्थिती

जळगाव, प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेतर्फे सलग सहाव्या वर्षी आयोजित कुमार गट उत्तर महाराष्ट्रस्तरीय आमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जळगाव, धुळे, नाशिक, अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यांतील १२ संघांनी सहभाग घेतला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक हरी शास्त्री आणि गितेश राऊत, शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया, महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर युवाधिकारी प्रितम शिंदे, धुळेचे विस्तारक कुणाल कानकाटे, नाशिक युवासेनेचे सुदर्शन चांदनानी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषा पाटील, कार्तिक खैरनार, बालजितसिंग जोहरी, अजिंक्य पाटील आणि प्रसिद्धीप्रमुख उमेश चौधरी आदी उपस्थित होते.

समारोपाला चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. त्यांनी काही सामने पाहून खेळाडूंच्या कामगिरीचा आनंद घेतला. उशिरापर्यंत सामने सुरू होते.

विजेत्या संघांची कामगिरी

मुलांच्या गटात पाचोरा संघाने प्रथम क्रमांक पटकावला. अकोला संघ द्वितीय, तर चाळीसगाव संघ तृतीय क्रमांकावर राहिला.

मुलींच्या गटात नाशिक संघाने प्रथम क्रमांक मिळवला. पाचोरा संघाने द्वितीय, तर जळगाव संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेमुळे उत्तर महाराष्ट्रातील युवा बास्केटबॉल खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.###

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button