Other

धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्याकडून विनम्र अभिवादन

धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्याकडून विनम्र अभिवादन

अमळनेर प्रखर हिंदुत्वाचे तेजस्वी विचारवंत, धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्या शिवसेना कार्यालय, अमळनेर येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी स्वतः पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. दिघे साहेबांनी हिंदुत्वाची विचारधारा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा आजही शिवसैनिक व युवासैनिकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

या अभिवादन कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील, नगरसेवक दीपक चौगुले, नगरसेवक अनिल (अबू) गंगाराम महाजन, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब संदानशिव, सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम हटकर, युवासेना तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, शिवसेना अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख गुलाम नबी पठाण, युवासेना उपशहर संघटक यश साळुंखे, विजेंद्र शिरसाळे, पंकज भोई, पंकज बाविस्कर यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचा, हिंदुत्वाच्या कार्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button