Social

ग्रामीण रुग्णालय अमळगावच्या सनियंत्रण व सल्लागार समितीवर निलेश महाले यांची निवड

ग्रामीण रुग्णालय अमळगावच्या सनियंत्रण व सल्लागार समितीवर निलेश महाले यांची निवड

सामाजिक कार्याची दखल; आरोग्य सेवांच्या उन्नतीसाठी जबाबदारी

अमळनेर | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ग्रामीण रुग्णालय अमळगाव (ता. अमळनेर) येथे आरोग्य सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सनियंत्रण व सल्लागार समितीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश लक्ष्मण महाले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, या समितीच्या अध्यक्षपदी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून रुग्णालयातील आरोग्य सेवा, रुग्णांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवली जाणार आहे.

समितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सौ. पूनम राहुल पवार, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी म्हणून संजय कावडे, तर सदस्य सचिव म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कार्यरत राहणार आहेत. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक, गट विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि तालुका आरोग्य अधिकारी हे पदसिद्ध सदस्य म्हणून समितीत सहभागी असतील.

निलेश महाले यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार उपचार, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ आणि रुग्णालयातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या निवडीबद्दल अमळनेर व अमळगाव परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी निलेश महाले यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, हीच माझी प्राथमिकता राहील. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

निलेश लक्ष्मण महाले, सदस्य, सनियंत्रण व सल्लागार समिती, ग्रामीण रुग्णालय अमळगाव

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button