खान्देश सुपुत्राचा ‘महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार’ने गौरव

खान्देश सुपुत्राचा ‘महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार’ने गौरव
चोपडा(प्रतिनिधी)- चोपडा येथील वामन ॲक्युपंक्चर अँड नॅचरोपॅथी सेंटरचे संचालक डॉ.पृथ्वीराज सैंदाणे यांना आरोग्य सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १९ जुलै रोजी झालेल्या भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व एजीएमए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात ॲक्युपंक्चर व निसर्गोपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपचारकांचा सन्मान करण्यात आला. आयुर्वेद, योग, सिद्ध, होमिओपॅथी,ॲक्युपंक्चर आणि निसर्गोपचार अशा विविध उपचार पद्धतींच्या प्रचार- प्रसारासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेने डॉ. सैंदाणे यांच्या सेवाकार्याची दखल घेत त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेते डॉ. सुयोग गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.नाझिर काझी, ॲड दत्तात्रय जाधव,ॲड नागेश सोनुने यांच्यासह आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व ए.जी.एम.ए. चे चेअरमन डॉ. सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, तसेच डॉ. अभिजीत कवठकर, डॉ. प्रशांत सावंत,डॉ.दिशा चव्हाण,डॉ. स्मिता खारकर, डॉ.विनोद ढोबळे, डॉ. सारंग फुके, डॉ.श्रीधर मेश्राम, डॉ. राजेंद्र गोरे, डॉ. तुषार वाघुळदे, डॉ. विजय पाटील आदी पदाधिकारी व अनेक वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानाबद्दल खान्देश परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे






