Social

विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

जळगाव, ;- विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता, अचूकता आणि कायदेशीर तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी मतदान प्रक्रियेबाबत नियुक्त कर्मचा-यांना मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणादरम्यान निवडणुकी संदर्भातील कायदेशीर तरतुदी, मतदानांवेळी कर्मचारी नियुक्ती, मतदान पद्धती, मतपत्रिकेचा वापर, निवडणूक साहित्य ताब्यात घेण्याची प्रक्रिया तसेच मतदान साहित्याची तपासणी याविषयी माहिती देण्यात आली. मतदान यादीची पडताळणी, मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर करावयाची कार्यवाही तसेच आदर्श आचार संहितेच्या पालन होण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या.

मतदान केंद्राची रचना, मायक्रो ऑब्झर्वर नियुक्ती व व्हिडिओग्राफीची व्यवस्था, मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांमधील कामाचे वाटप याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदान प्रतिनिधींची नियुक्ती, त्यांचे अधिकार व कर्तव्ये तसेच निवडणूक नियमाची माहिती देण्यात आली. तसेच मतदानाची गोपनीयता अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

मतदान पेटी तयार करण्याची प्रक्रिया, तिचा वापर व सुरक्षितता याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच मतदारांना मतपत्रिका देण्याची पध्दत, मतदानाची संपूर्ण कार्यपद्धती याचेही प्रात्यक्षिक उपस्थित कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले.

यावेळी प्रशिक्षणाला संबंधित तहसीलदार, मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button