Other

ॲड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री मंगळ ग्रह मंदिर येथे आयोजन; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

ॲड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री मंगळ ग्रह मंदिर येथे आयोजन; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) : ॲड. ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी, दि. २६ जुलै रोजी अमळनेर शहरातील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी तसेच आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या शिबिराचा लाभ अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहपरिवार घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मोफत बससेवेचीही व्यवस्था करण्यात आली असून बस बस स्टँड, संविधान चौक (ढेकू पिंपळे रोड), सुभाष चौक, झामी चौक आणि भद्रा प्रतीक मॉल या ठिकाणांहून उपलब्ध राहणार आहे.

शिबिराबाबत अधिक माहितीसाठी ९०२२२१७३४९, ९५४५५२५०००, ९६०७७२११११ किंवा ७०५८७२०००३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button