बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग

बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग
बोदवड : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. याच अनुषंगाने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्या वतीने बोदवड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स यांच्या सहकार्याने रुग्णालयीन आपत्कालीन परिस्थितीत ’बेसिक लाईफ सपोर्ट’ (मूलभूत जीवन रक्षक उपाय) व्यवस्थापन या विषयावर सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम (सीएमई) आयोजित करण्यात आला.
स्टेशन रोडवरील वृंदावन गार्डन बोदवड येथे हा कार्यक्रम पार पडला. या सीएमईमध्ये ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थापनासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.या सीएमई मध्ये डॉ. युवराज बढे यांनी मूलभूत जीवन रक्षक उपाय तसेच रुग्णालयातील आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. आपत्कालीन प्रसंगी रुग्णाची प्राथमिक तपासणी, जीवनावश्यक बाबींचे तातडीने व्यवस्थापन, योग्य निर्णय घेण्याची पद्धत आणि रुग्णाला पुढील उपचारासाठी आवश्यक ती वैद्यकीय मदत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी डॉ. राजसूरज, डॉ. ल्युसी, डॉ. पायल तसेच पीआरओ महाजन यांच्यासह संबंधित टीमने कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. ग्रामीण व तालुका पातळीवर कार्यरत डॉक्टरांना आपत्कालीन उपचार पद्धतींबाबत अद्ययावत ज्ञान मिळावे आणि त्याचा थेट फायदा रुग्णसेवेला व्हावा, हा या सीएमईआयोजनामागील प्रमुख उद्देश होता.या उपक्रमामुळे बोदवड तालुक्यातील जनरल प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक प्रभावीपणे रुग्णसेवा देण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय माहिती मिळाली. सहभागी डॉक्टरांनी अशा प्रकारच्या उचए कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.







