Other

पत्रकार संजय भोकरे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी

पत्रकार संजय भोकरे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा अमळनेरच्या वतीने राज्य समन्वयक तथा सांगली येथील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि दैनिक जनप्रवाहचे समूह संपादक संजय भोकरे यांना तातडीने ‘झेड प्लस’ दर्जाचे पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सांगली येथील अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेवरून सुरू असलेल्या वादातून संजय भोकरे यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. याप्रकरणी सांगली पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे.

पत्रकार संघाचा तीव्र संताप
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने या घटनेला अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांवर वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून संजय भोकरे यांना कडक सुरक्षा द्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

शासनाने कठोर पावले उचलावीत
संघटनेने निवेदनाद्वारे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. तसेच पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​या निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डॉ. समाधान मैराळे, सुरेश डांगोरे, प्रविण बैसाणे, हितेंद्र बडगुजर, नुस्खण पठाण, प्रा. डॉ. विजय गोडीसर, उदयराज मोरे, महेश संदानशीव, अजय बिचवे आणि आत्माराम अहिरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button