भडगावात इंधन बचतीसाठी जनजागृतीपर सायकल रॅली उत्साहात

भडगावात इंधन बचतीसाठी जनजागृतीपर सायकल रॅली उत्साहात
भडगाव :(प्रतिनिधी )पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रा. डॉ. दिनेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाने, आणि रवींद्र वाडेकर,परिक्षीत पाटील यांच्या परिश्रमातून भडगाव क्रिकेट अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेलीजनजागृतीपर सायकल रॅली रविवारी उत्साहात संपन्न झाली.
या रॅलीत भडगाव क्रिकेट अकॅडमी चे खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर निलेश पाटील, विजय देशपांडे, जाकीर दादा कुरेशी,प्राध्यापक दीपक मराठे, रावसाहेब पाटील, डॉक्टर हेमंत पाटील सुरेशजी भंडारी, चेतन रंगनाथ पाटील तसेच इतर मान्यवरांनी सहभाग नोंदविला. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सकाळी आझाद चौक येथून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर नगर पालिका, मेन रोड, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी आयोजकांनी इंधन बचतीचे महत्त्व पटवून देत नागरिकांनी दैनंदिन जीवनात शक्य तितका सायकलचा वापर करावा, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भडगाव क्रिकेट अकॅडमीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.






