Other

माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांच्या कन्या शुभांगी परदेशी यांची ‘जलसंधारण अधिकारी’पदी झेप; भडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांच्या कन्या शुभांगी परदेशी यांची ‘जलसंधारण अधिकारी’पदी झेप; भडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

भडगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत भडगावच्या शुभांगी अमोल महेर (परदेशी) यांची ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण अधिकारी पदावर निवड झाली आहे.

शुभांगी परदेशी या भडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांच्या कन्या असून, नाशिक येथील सहआयुक्त सुदाम परदेशी यांच्या पुतणी आहेत. त्यांनी पुणे येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथून बी.ई. सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे.

शुभांगी परदेशी या यापूर्वी नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत निफाड पंचायत समितीत सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट म्हणून कार्यरत होत्या. नोकरी सांभाळत त्यांनी जलसंधारण विभागाची परीक्षा देत हे उल्लेखनीय यश संपादन केले.

भडगावच्या कन्येने मिळविलेल्या या यशाबद्दल आमदार किशोर पाटील यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

परदेशी, राजपूत, मिणा समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ कोंडू परदेशी, जिल्हा सचिव विनोद महेर सर, तंटामुक्ती जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ जोनवाल, उपाध्यक्ष भगवानभाऊ डेडवाल तसेच भडगाव तालुकाध्यक्ष अशोकबाप्पू परदेशी, पाचोरा तालुकाध्यक्ष इंदलसिंग गोठवाळ, जामनेर तालुकाध्यक्ष अमोलभाऊ कायठे, सोयगाव तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ मचीये, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भगवानभाऊ महेर, कन्नड तालुकाध्यक्ष प्रकाशबाप्पू चांदा यांच्यासह समाजाच्या पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व समाजबांधवांनी शुभांगी परदेशी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button