Crime

सायकल चोर पकडला; २६ हजारांच्या दोन सायकली जप्त

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

सायकल चोर पकडला; २६ हजारांच्या दोन सायकली जप्त

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव,  (प्रतिनिधी):
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायकल चोरीच्या गुन्ह्यात एक संशयितास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. चोरी गेलेल्या सायकलची एकूण किंमत अंदाजे २६ हजार रुपये आहे.

२७ मे रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत फिर्यादी गजेन्द्र कुमार महाजन (वय ४५, रा. जय मातादी अपार्टमेंट, मोहाडी रोड, आदर्शनगर, जळगाव) यांचा मुलगा आपल्या सायकलसह गायत्रीनगर, शिरसोली रोड परिसरात गेला होता. तेथील काम आटोपून परत सायकल घेण्यासाठी गेल्यावर ती जागेवरून गायब असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी रात्री ९.०४ वाजता अज्ञात इसमाविरुद्ध सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. २८ मे रोजी पहाटे १.१५ वाजता मयुर कॉलनी, पिंप्राळा येथे सापळा रचून जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याच्याकडून खालील दोन सायकली जप्त करण्यात आल्या:

NEW SPEED MSFSDDMW कंपनीची लाल रंगाची सायकल – अंदाजे किंमत 11 हजार आणि  HUGE (27.5) कंपनीची एम-सिल्वर रंगाची सायकल  अंदाजे किंमत पंधरा हजार असा एकूण 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत झनके, पोना विकास सातदिवे, योगेश बारी, पोकॉ मंदार महाजन आणि इज्जाईल खाटील यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा तपास पोना विकास सातदिवे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button