Social

अग्निवीर चारुदत्त विसपुते याचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत

अग्निवीर चारुदत्त विसपुते याचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत

जळगाव, प्रतिनिधी
महाजन नगरातील युवक चारुदत्त संतोष विसपुते याने भारतीय सैन्यात “अग्निवीर” म्हणून यशस्वी भरती होऊन आपल्या बालपणीच्या स्वप्नाला मूर्त रूप दिले आहे. देशसेवेसाठी सज्ज झालेल्या या नवयुवकाचे स्वागत महाजन नगर परिसरात ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीने आणि देशभक्तीपर गाण्यांच्या निनादात मोठ्या जल्लोषात करण्यात आले.

नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या स्वागत सोहळ्यात बंडू वाणी, किशोर नेमाडे, भिकन पाटील, विनोद शेवाळे, मुकेश नाईक, संजय देवरे, भारत पाटील, शरद पाटील, निलेश कासार, कल्पेश सोनार, राजेश बनछोडे, विजय कासार, तुषार नेमाडे, गोलू पांडे, मॉन्टी राजपूत, अनिकेत चौधरी, गौरव सोनार यांसह परिसरातील सर्व धारकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चारुदत्त विसपुते सध्या जळगावच्या नूतन महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. २०२४ मध्ये त्याने अग्निवीर भरतीच्या मैदानी चाचणीत उल्लेखनीय कामगिरी करत सैन्यात प्रवेश मिळवला. मध्यप्रदेश येथे त्याचे प्रशिक्षण ५ जून २०२५ रोजी पूर्ण झाले असून आता तो थेट कारगिल सीमेवर देशसेवेसाठी हजर होणार आहे.

सीमेवर रुजू होण्यापूर्वी चारुदत्त आपल्या गावी आला असता, ग्रामस्थांनी त्याचा अभिमानाने आणि प्रेमाने जल्लोषात सत्कार करत एकप्रकारे देशसेवेच्या या व्रताला सामूहिक शुभाशीर्वाद दिले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button