Politics

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भाजयुमोची ’जागर यात्रा’ उत्साहात संपन्न; हजारो विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

जळगाव – आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियामुळे कंटेंट क्रिएशन करणे अत्यंत सोपे झाले आहे. मात्र, या माध्यमाचा मानवी मनावर नकारात्मक परिणामही होत आहे. तरुणांमधील संयम कमी होत असून चिडचिड वाढताना दिसत आहे. अशा काळात अपयश किंवा हार पचविण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. सोशल मीडिया हे केवळ करमणुकीचे साधन नसून त्याचा अत्यंत विचारपूर्वक आणि योग्य वापर करण्याची गरज आहे, असे परखड मत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केले.गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ’जागर यात्रे’निमित्त रविवार, २८ जून रोजी आयोजित भव्य संवाद कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. उल्हासजी पाटील होते. तर व्यासपीठावर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीपदादा सावळे, भाजपा जळगाव जिल्हा पूर्वच्या सरचिटणीस डॉ केतकीताई पाटील, दौरा संपर्क प्रमुख तेजस्विनी दुर्गे ताई, भाजपा जिल्हा महामंत्री, भुसावळ उपाध्यक्ष क्रिश कोठारी, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राम शिंदे, निलेश पाटील आणि वीरेंद्रदादा प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना शाल, श्रीफळ, पुस्तक आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती भेट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महामंत्री डॉ केतकी ताई पाटील यांनी मनोगतात सांगितले कि, देशातील प्रत्येक तरुण स्वतःचा बौद्धिक, कौशल्याधारित आणि नैतिक विकास करेल, तेव्हाच खर्‍या अर्थाने देशाचा विकास होईल. युवा पिढीने स्वतःला सक्षम बनवून राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी ’एकच मोर्चा, युवा मोर्चा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू दादा यांनी केले, तर अध्यक्षस्थानावरून माजी खासदार डॉ. उल्हासजी पाटील यांनी युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचे आवाहन करताना सांगितले की, आजच्या युगात तंत्रज्ञानाला अजिबात घाबरू नका. कृत्रिम बुद्धिमत्ताच्या माध्यमातून आज प्रत्येक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. या -ख आणि प्रगत तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात पुढे जा. आई-वडिलांनी ज्या विश्वासाने आणि हेतूने आपल्याला शिक्षणासाठी पाठविले आहे, त्याचा सदैव आदर राखा. आपले शिक्षण आणि ज्ञान यांचा वापर करून समाजातील शेवटच्या घटकाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहा, असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित हजारो विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमासाठी गोदावरी फाऊंडेशन संचलित वैद्यकीय, फिझिओथेरपी, होमिओपॅथी, नर्सिंग, आयुर्वेद महाविद्यालयातील व्यवस्थापन विभाग, शिक्षक-शिकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.यूट्यूबच्या कमाईतून समाजकार्य; ’मकोबा’चा प्रभावी वापरआपला अनुभव सांगताना कृष्णराज महाडिक म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करणे खूप कठीण आणि आव्हानात्मक असते. आज तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन मी स्वतः ’मकोबा’चा वापर करतो. यूट्यूबच्या माध्यमातून मला मिळणारे पैसे मी स्वतःसाठी न ठेवता, त्यातून समाजासाठी विविध कल्याणकारी कार्ये करण्यास सुरुवात केली आहे. कौटुंबिक मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी कुटुंब व्यवस्थेवरही आम्ही विशेष काम केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button