भाजपा युवा मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी विकास सुरेश महाजन यांची नियुक्ती.

भाजपा युवा मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी विकास सुरेश महाजन यांची नियुक्ती.
भडगाव/प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, भडगाव येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विकास सुरेश महाजन यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विकास महाजन हे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व असून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक बांधिलकी आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योजक म्हणूनही त्यांची ओळख असून, भडगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध हॉटेल गायत्री भोजनालयचे ते संचालक आहेत.
सामाजिक व संघटनात्मक कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक म्हणून सुरू झाली. संघामध्ये कार्य करताना त्यांनी विविध स्तरांवरील अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. तसेच भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करत असताना त्यांनी भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस म्हणूनही प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली आहे. तालुका तसेच जिल्हास्तरावर त्यांनी संघटन बळकटीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय असून,माळीसमाजामध्ये त्यांनी महाराष्ट्रमाळी महासंघाच्या अध्यक्षपदासह जिल्हा उपाध्यक्ष यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत भाजपा युवा मोर्चाने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
या त्यांचे निवडीबद्दल कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.






