Other

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील निकृष्ट दर्जा काम करण्याची स्पर्धा….!

शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद घुगे यांचा आरोप

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील निकृष्ट दर्जा काम करण्याची स्पर्धा….!

शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद घुगे यांचा आरोप

जळगाव | प्रतिनिधी

पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदार याला काम देऊन फूपनी येथील नुकत्याच झालेल्या १ कोटी ५० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंत,धक्का यांचे तीन तेरा झालेले आहे.
हा रस्ता तसेच संरक्षण भिंत कोसळल्या मुळे विद्यार्थ्यांना,शेतकरी,महिला वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
फूपनी पासून पुढील देवगाव,गाढोदा,आमोदा बुद्रुक,जामोद,पळसोद गावांचा संपर्क तुटला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की,या झालेल्या कामाचे एनोसी कोणत्या अधिकारी वर्गाने दिली त्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी.
हा धक्का,संरक्षण भिंत तत्काळ नविन करून देण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल.
ये वेळी योगराज बापू सपकाळे,गुलाब पाटील,संजय पाटील,राहुल सपकाळे,सुपदु ठाकरे,दीपक सपकाळे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button