Other

अरुश्री हॉस्पिटलतर्फे स्व.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर 

अरुश्री हॉस्पिटलतर्फे स्व.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर 
जळगाव (प्रतिनिधी) : स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवनरंग विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर मंगळवार (दि.३०) रोजी अरुश्री हॉस्पिटल येथे सकाळी ८ ते १२ या दरम्यान पार पडले.
रिंगरोडवरील अरुश्री हॉस्पिटलच्या डॉ.परिक्षीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.स्वाती बाविस्कर यांच्या विशेष सहकार्याने झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराला मुक्ती फाऊंडेशन जळगावचेही सहकार्य लाभले होते. उद्‌घाटन प्रसंगी नटराज पूजन करुन आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली. नटराज पूजन प्रसंगी अरुश्री हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.स्वाती बाविस्कर, मुक्ती फाऊंडेशनचे मकुंद गोसावी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार – गुजराथी, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांची उपस्थिती होती. उद्‌घाटनानंतर डॉ.स्वाती बाविस्कर यांनी उपस्थित कलावंतांना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी व औषध घेतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
शिबिरात डॉ.स्वाती बाविस्कर, डॉ.हर्ष चौधरी, श्री.राहुल बनसोडे व अरुश्री हॉस्पिटलमधील आरोग्यसेवकांनी सहभागी कलावंतांच्या सीबीसी रक्त तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी आदी तपासण्या केल्या तसेच आवश्यक औषधांचे विनामूल्य वितरण केले. या शिबिराचा लाभ शहरातील ३८ कलावंतांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनोद ढगे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे दिपक महाजन, मोहित पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, दर्शन गुजराथी, राहुल पवार यांनी परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button