PoliticsSocial

पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणी जळगाववरून उलगडणार; ज्येष्ठ पत्रकार शुभदा नेवे यांनी घेतली विशेष मुलाखत

पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणी जळगाववरून उलगडणार; ज्येष्ठ पत्रकार शुभदा नेवे यांनी घेतली विशेष मुलाखत

जळगाव, प्रतिनिधी : जळगावचे सुपुत्र आणि संपूर्ण देशाला ज्यांचा सार्थ अभिमान आहे, असे पद्मश्री, खासदार तथा विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल देवराव निकम यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आकाशवाणी जळगाव केंद्राच्या विशेष मुलाखतीतून श्रोत्यांसमोर उलगडणार आहे. ज्येष्ठ पत्रकार शुभदा नेवे यांनी ॲड. निकम यांची ही प्रदीर्घ व विशेष मुलाखत घेतली असून, सोमवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ९.२५ वाजता तिचे प्रसारण होणार आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या न्यायव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ॲड. निकम यांची नाळ कायम जळगावशी जोडलेली राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल जळगावकरांसह सर्वांनाच मोठे कुतूहल आहे. आकाशवाणी जळगाव केंद्राच्या ‘स्पंदन : वृत्त आणि व्यक्तींचं’ या विशेष कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत घेण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे बालपण, जळगावमधील सुरुवातीचे दिवस, मुंबईपर्यंतचा संघर्षमय प्रवास, वकिली क्षेत्रातील कारकीर्द तसेच देशभर गाजलेले बॉम्बस्फोट आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासारख्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण खटल्यांमधील थरारक अनुभवांना उजाळा देण्यात आला आहे.

आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे यांनी ही माहिती दिली. या विशेष कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी त्यांच्यासह कार्यक्रम अधिकारी विजय भुयार, ज्येष्ठ उद्घोषक नरेंद्रकुमार ठाकूर, महाराष्ट्र पर्यटनचे राजेश भागवत आणि अमेय नेवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button