
रावेरमध्ये गुरुवारपासून मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; आ. अमोलदादा जावळे यांच्या वैद्यकीय कक्षाचा पुढाकार
रावेर प्रतिनिधी अंधुक किंवा धुरकट दिसणे, रात्री दिसण्यात अडचण येणे अथवा डोळ्यासमोर पडदा आल्यासारखे वाटणे—अशी मोतीबिंदूची लक्षणे असणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आ. अमोलदादा जावळे यांच्या वैद्यकीय सहायता कक्षातर्फे रावेर येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (२६ नोव्हेंबर) रावेर ग्रामीण रुग्णालयात तपासणी होणार असून, गरजू रुग्णांवर शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मोतीबिंदूच्या त्रासामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य रुग्णांना दैनंदिन कामे करताना मोठी अडचण येते. ही बाब लक्षात घेऊन रुग्णांना वेळेवर उपचार व स्वच्छ दृष्टी मिळावी, या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे. तपासणी आणि शस्त्रक्रिया या दोन्ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शिबिराचे वेळापत्रक व ठिकाण :
- तपासणी शिबिर : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ (सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत) — ठिकाण : ग्रामीण रुग्णालय, रावेर.
- मोतीबिंदू शस्त्रक्रिया : शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ — ठिकाण : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), जळगाव.
तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी सोबत आधार कार्ड तसेच जुने वैद्यकीय रिपोर्ट किंवा चष्मा आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी नागरिकांनी 7387737674, 8623822948, 8767264608, 8208344508, 9503577918 किंवा 8657222421 या क्रमांकांवर संपर्क साधावा. रावेर व परिसरातील गरजू नागरिकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







