Other

भिलपुरा येथील लालशाह बाबा दर्ग्यावर श्रीराम रथाचे जल्लोषात स्वागत; सामाजिक सलोख्याचे दर्शन

भिलपुरा येथील लालशाह बाबा दर्ग्यावर श्रीराम रथाचे जल्लोषात स्वागत; सामाजिक सलोख्याचे दर्शन

​जळगाव प्रतिनिधी जळगाव नगरीचे वैभव आणि ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या पवित्र श्रीराम रथाचे भिलपुरा येथील लालशाह बाबा दर्ग्यावर आगमन होताच ‘सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन’ व मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात व आपुलकीने स्वागत करण्यात आले. या सोहळ्यातून शहरातील सामाजिक एकोपा आणि सलोख्याचे दर्शन घडले.

​सुरुवातीला हिंदू बांधव व रथोत्सव समितीच्या वतीने अप्पा महाराजांचे परम मित्र पीर लालशाह बाबा यांच्या दर्ग्यावर भक्तीभावाने चादर व नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन आणि मुस्लिम बांधवांतर्फे श्रीराम रथावर पुष्पवृष्टी करत फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. रथोत्सव समितीचे सदस्य, मोगरी लावणारे सेवेकरी, चोपदार तसेच बंदोबस्तासाठी तैनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा पुष्पहार, गळाभेट आणि आलिंगन देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले.

​या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, सै. अयाज अली नियाज अली, प्रभाकर चौधरी, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, विलास हरी चौधरी, अनिकेत पाटील, जयवर्धन नेवे, राहुल चौधरी, भानुदास चौधरी, पंडित पाटील, अमोल चौधरी, सुरेश सपके, सुजित चौधरी, हाजी शकूर बादशाह, शेख हाजी जलालुद्दीन, जावेद अहमद, किशोर पाटील, रोहन शैलेंद्र, मोईन असगर, इम्तियाज अली, अकबर इब्राहिम, युसूफ अझीझ, आदिल गनी, मोहम्मद नईम यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button