Crime

जळगावात मोटारसायकल चोरट्याला अटक; २.३२ लाखांच्या ९ दुचाकी हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; दुचाकी चोरीचे ९ गुन्हे उघडकीस

जळगावात मोटारसायकल चोरट्याला अटक; २.३२ लाखांच्या ९ दुचाकी हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; दुचाकी चोरीचे ९ गुन्हे उघडकीस

जळगाव | महा पोलीस न्यूज चेतन वाणी जळगाव शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक केली आहे. गोकुळ साहेबराव पाटील (वय ४५, रा. बोरसर, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या एकूण ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, या कारवाईत मोटारसायकल चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. हस्तगत केलेल्या दुचाकींची किंमत सुमारे २ लाख ३२ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बळीराम पेठेतून मोटारसायकल चोरी

३० ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीची तक्रार दिली होती. बळीराम पेठेतील गोपाल स्टेशनरीसमोरील सार्वजनिक ठिकाणी फिर्यादी यांनी त्यांची काळ्या रंगाची बजाज प्लॅटिना (क्रमांक MH-19-EM-2330) उभी केली होती. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते २.२० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली होती. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार राहुल गायकवाड यांनी आपल्या पथकाला आवश्यक सूचना देऊन तपास सुरू केला.

स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासातून गोकुळ साहेबराव पाटील याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने बळीराम पेठेतील मोटारसायकल चोरीची कबुली दिली. अधिक तपासात त्याने जळगाव शहरातून आणखी आठ मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून संबंधित गुन्ह्यातील एक आणि अन्य आठ अशा एकूण नऊ मोटारसायकली हस्तगत केल्या.

जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड

या कारवाईमुळे जळगाव शहर पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे आठ आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हस्तगत केलेल्या मोटारसायकलींची किंमत सुमारे २ लाख ३२ हजार रुपये आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, अतुल वंजारी, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे, विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, रिजवान शेख यांच्यासह जळगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तपास पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button