Other

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील कॅन्सर तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांचे संयुक्त यश
जळगाव : मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर येथील ४० वर्षीय महिलेवर तातडीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त झाली आहे. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील कॅन्सर तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या संयुक्त उपचाराला यश आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सतत पोटदुखी व पोट फुगण्याचा त्रास होत होता. सुरुवातीला सामान्य आजार समजून उपचार घेतल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात स्त्रीरोग विभाग प्रमुक डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मृदुला मुंगसे आणि डॉ. प्राजक्ता पाटील यांनी महिलेची सीटी स्कॅन तपासणी केली. या अत्याधुनिक तपासणीत महिलेला ओव्हेरियन (अंडाशयाचा) कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यानंतर कॅन्सरतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल पाच तास चाललेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे अंडाशयाजवळील दोन मोठ्या गाठी यशस्वीपणे काढण्यात आल्या. या उपचारामुळे महिलेला नवजीवन मिळाले असून सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे.महिलेला पोटात सतत वेदना, पोटाचा वाढलेला आकार आणि दैनंदिन कामात अडथळा निर्माण होऊ लागल्याने त्यांनी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात तपासणी केली. स्त्रीरोग तज्ज्ञांनी आवश्यक वैद्यकीय चाचण्या करून सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. सीटी स्कॅनमध्ये अंडाशयाजवळ संशयास्पद गाठी आढळून आल्या. पुढील तपासणीत हा ओव्हेरियन कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले.रुग्णाची प्रकृती आणि आजाराची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने कॅन्सरतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या संयुक्त पथकाने रुग्णावर सायटोरिडक्शन सर्जरी (उूीेंअ‍ॅशर्वीलींळेप र्डीअ‍ॅसशअ‍ॅू) आणि डि-बल्कींग सर्जरी (ॄशर्लीश्रज्ञळपस र्डीअ‍ॅसशअ‍ॅू) या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जवळपास पाच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत अंडाशयाजवळील दोन मोठ्या कॅन्सरच्या गाठी यशस्वीरित्या काढण्यात आल्या. तसेच शरीरातील कॅन्सरग्रस्त ऊती शक्य तितक्या प्रमाणात काढून टाकण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कॅन्सरमुक्त जीवनाकडे नेण्याच्या दृष्टीने पुढील उपचार सुरू आहेत.विशेष म्हणजे, अत्यंत खर्चिक समजली जाणारी ही शस्त्रक्रिया शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत रुग्णाला पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहण्याची वेळ रुग्णावर आली नाही. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि शासकीय योजनांचा लाभ यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळू शकले.
डॉक्टरांची प्रतिक्रिया :
रुग्णालयातील कॅन्सरतज्ज्ञांनी सांगितले की, “ओव्हेरियन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य पोटदुखी, पोट फुगणे किंवा भूक कमी लागणे अशी असल्यामुळे महिलांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ही लक्षणे सातत्याने जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि शस्त्रक्रिया झाल्यास रुग्णाला चांगले आयुष्य मिळू शकते. या रुग्णावर करण्यात आलेली सायटोरिडक्शन व डि-बल्कींग सर्जरी यशस्वी ठरली असून पुढील उपचारांमुळे त्या पूर्णपणे निरोगी जीवन जगू शकतील.”

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button