Other

विधान परिषद निवडणूक २०२६ जाहीर; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

विधान परिषद निवडणूक २०२६ जाहीर; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

जळगाव : महाराष्ट्र विधान परिषद दिवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा झाली असून आजपासून दिनांक २५ जून २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता लागु राहणार असून तिची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 तसेच निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.

आचारसंहितेनुसार कोणत्याही खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर विनापरवाना पोस्टर्स लावणे, भित्तीलेखन करणे, निवडणूक चिन्हे काढणे, कापडी फलक किंवा झेंडे लावणे तसेच इतर कोणत्याही प्रकारे मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित व्यक्ती पात्र असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button