PoliticsSocial

मेहरूण तलावातील गणेश घाटावर विसर्जनाच्या तयारीचा महापौरांनी घेतला आढावा

स्वच्छता, सुरक्षा व शिस्तबद्ध व्यवस्थेसाठी महापालिका प्रशासनाला सूचना

मेहरूण तलावातील गणेश घाटावर विसर्जनाच्या तयारीचा महापौरांनी घेतला आढावा

स्वच्छता, सुरक्षा व शिस्तबद्ध व्यवस्थेसाठी महापालिका प्रशासनाला सूचना

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मेहरूण तलावातील गणेश घाटाची पाहणी करून श्री गणेश विसर्जनाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गणेश विसर्जन सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी महापौर काळे यांनी आरोग्य विभागाला सविस्तर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. गणेश घाटावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी निर्माल्य कलशांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नागरिक व गणेश मंडळांनी निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आणू नये. निर्माल्य कागदात गुंडाळून किंवा कागदी पिशवीत आणून ते थेट निर्माल्य कलशातच टाकावे. तसेच घरातून निघताना प्लास्टिकच्या पिशव्या सोबत आणू नयेत, असे आवाहन महापौरांनी केले.

विसर्जनाच्या वेळी परिसरात स्वच्छता राखण्याबरोबरच विसर्जनस्थळी अनावश्यक गर्दी टाळून सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विसर्जनासाठी उपलब्ध असलेले तराफे, तैनात करण्यात येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती महापौरांनी घेतली.

गणेश विसर्जनाच्या कालावधीत कार्यरत राहणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या भोजन व्यवस्थेचाही महापौरांनी आढावा घेतला. गणेशोत्सव काळात भाविकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि सुविधांना प्राधान्य देऊन विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button