Other

मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

जळगाव,  –जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व निर्दोषपणे पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निर्दोष आणि मा. भारत निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार पूर्ण करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष तांत्रिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षणात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उप विभागीय अधिकारी बबन काकडे तसेच मास्टर ट्रेनर्स , मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त सर्व राजपत्रित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button