Crime

 ३.५३८ किलोग्राम गांजासह दोन आरोपी जेरबंद, २.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 ३.५३८ किलोग्राम गांजासह दोन आरोपी जेरबंद, २.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नशिराबाद पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : अंमली पदार्थांच्या अवैध विक्री, वाहतूक व सेवनाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नशिराबाद पोलिसांनी कारवाई करत ३.५३८ किलो ग्राम गांजा जप्त केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गांजा, मोटारसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना प्रभावी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून गोपनीय माहिती संकलित करून कारवाई सुरू होती. दरम्यान, नशिराबाद गावातील साती बाजार चौक येथे दोन व्यक्ती अंमली पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे २ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साती बाजार चौक परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणारे राजेश भारत बांटूगे (वय ३१, रा. महादेव मंदिराजवळ, तांबापुरा, जळगाव) आणि सुभाष सोमा मराठे (वय ६८, रा. साती बाजार, नशिराबाद) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीदरम्यान मोटारसायकलच्या डिक्कीत गांजा आढळून आला.

पोलिसांनी २१०८ ग्रॅम गांजा, किंमत १ लाख रुपये, तसेच १४३० ग्रॅम अर्धवट सुकलेला गांजा, काड्या व बियांसह, किंमत ७९ हजार ५०० रुपये असा एकूण ३.५३८ किलो गांजा जप्त केला. याशिवाय ७० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल (एमएच १९ सीडी ९५७४), १० हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि २ हजार रुपये किमतीचा भारत कंपनीचा मोबाईल असा एकूण २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २५०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम २०(ब)(II) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोलीस हवालदार गुणवंत देशमुख, चंद्रकांत पाटील, प्रशांत विरणारे, गिरीश शिंदे, अनिल देशमुख तसेच पोलीस कर्मचारी भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, प्रविण लोहार, सागर भिडे आणि विठ्ठल मुंडे यांच्या पथकाने केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button