EducationSport

बालदिनानिमित्त चिमुकल्यांना कलागुण सादरीकरणाची संधी

बालदिनानिमित्त चिमुकल्यांना कलागुण सादरीकरणाची संधी

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे १४ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रम

जळगाव, (प्रतिनिधी) : बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुभूती बालनिकेतन आणि माणुसकी सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बालकलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमात ४ ते १३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. गायन, वाद्य वादन, नृत्य, नाट्यछटा, नाटिका आणि एकपात्री अभिनय अशा विविध कलाप्रकारांतून मुलांना आपले कौशल्य सादर करता येईल. एकल तसेच सामूहिक सादरीकरणाची संधीही उपलब्ध आहे.

बालकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

इच्छुक बालकलाकारांनी २५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी शुभदा नेवे यांच्याशी ८३२९३७५०५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button