Other
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी
अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण; अधिकारी व कर्मचारी उपस्थित
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात *”स्वर्गीय अजित दादा पवार* यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी अधिष्ठाता, डॉ.गिरीष ठाकुर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.
या प्रसंगी डॉ.मारोती पोटे (उप अधिष्ठाता पद्व्युत्तर), डॉ.उमेश लाड (उप अधिष्ठाता, प्रशासन), डॉ.योगिता बावस्कर (वैद्यकीय अधिक्षक), डॉ.विश्वनाथ पुजारी, डॉ.शुभा घोणसीकर, डॉ.शितल लाड, डॉ.मनोज डोंगरे, डॉ.स्मिता बोरा, डॉ.अमित भंगाळे, संजय चौधरी, दिलीप मोराणकर, निलेश बारी, संदीप सोनकुसरे, मोहन पाटील हे उपस्थित होते.






