HealthSocial

जनसेवेला वाहिलेला वाढदिवस; आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांना मदतीचा हात

जनसेवेला वाहिलेला वाढदिवस; आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांना मदतीचा हात

जळगाव, दि. ५ ऑक्टोबर २०२६ :
वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस न ठेवता समाजातील गरजू नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा संकल्प पै. शिवाजी पाटील यांनी केला आहे. गेल्या काही काळापासून आरोग्य क्षेत्रात गरजू रुग्णांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून तसेच आमदार अमोल दादा जावळे यांच्या मार्गदर्शनातून शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना व वैद्यकीय सेवांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी पै. शिवाजी पाटील कार्यरत आहेत. आर्थिक अडचणींमुळे उपचार घेणे कठीण असलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांना उपचारासाठी आवश्यक मदत मिळावी, यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असतो.

“माझा वाढदिवस हा माझ्यासाठी केवळ उत्सवाचा दिवस नसून समाजातील गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणण्याचा दिवस आहे. आरोग्यसेवेपासून कोणताही गरजू नागरिक वंचित राहू नये, हीच माझी इच्छा आहे,” अशी भावना पै. शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली.

जनसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘सेवा हीच खरी समाजाची शक्ती’ या भावनेतून त्यांचे कार्य सुरू आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button