Health

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, प्रतिनिधी: मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मेंदूवर दबाव निर्माण झाल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या ८० वर्षीय वृद्ध रुग्णावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे तातडीने करण्यात आलेली मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍याच दिवशी रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर येऊन प्रतिसाद देऊ लागला. तसेच अवघ्या दोन दिवसांत रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता रुग्ण स्वतः चालण्यासही सक्षम झाला आहे.संबंधित वृद्ध रुग्णाला अचानक शरीराच्या उजव्या बाजूला अशक्तपणा येणे, बोलता न येणे, सूचनांना प्रतिसाद न देणे तसेच स्वतःहून डोळे उघडता न येणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारींसह महादेव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

रुग्णाची तातडीने तपासणी केली असता सीटी ब्रेनमध्ये सबअ‍ॅक्यूट सबड्युरल हेमॅटोमा म्हणजेच मेंदूच्या आवरणाखाली रक्त साचल्याचे आणि त्यामुळे मेंदूवर दबाव निर्माण होऊन मेंदू मधोमध सरकल्याचे निदान झाले.रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेता वेळ न दवडता आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एमसीएच न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांनी डाव्या बाजूला फ्रंटो-टेम्पोरो-पॅरिएटल डिकंप्रेसिव्ह क्रॅनिएक्टॉमी करून साचलेले रक्त बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. या शस्त्रक्रियेसाठी न्यूरोसर्जरी सिनिअर रेसिडेंट डॉ. श्रुती खंडागळेे, जनरल सर्जरी रेसिडेंट डॉ. पोमेश यांनी सहकार्य केले.

भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. ब—हाटे यांनी जबाबदारी सांभाळली.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली. दुसर्‍याच दिवशी रुग्ण शुद्धीवर येऊन व्यवस्थित प्रतिसाद देऊ लागला. त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्याने दोन दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, आता रुग्ण स्वतःच्या पायाने चालू शकत आहे.

या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च शासकीय योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला. त्यामुळे गंभीर आजारावरील अत्याधुनिक न्यूरोसर्जरीचा लाभ रुग्णाला विनामूल्य मिळाला.महादेव हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची तत्परता, अचूक निदान, वेळेत केलेली शस्त्रक्रिया आणि समन्वयपूर्ण वैद्यकीय सेवेमुळे एका ८० वर्षीय वृद्धाला नवजीवन मिळण्यास मदत झाली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button