Health

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

जळगाव : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या कम्युनिटी फिजिओथेरपी विभागातर्फे ६ ऑक्टोबर रोजी सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांच्या शारीरिक कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले.वाढत्या वयासोबत स्नायूंची ताकद व कार्यक्षमता कमी होणे, अशक्तपणा तसेच पडण्याचा धोका वाढणे यांसारख्या समस्यांची वेळीच ओळख होणे आवश्यक आहे.

याच उद्देशाने शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची सार्कोपेनिया व फ्रेल्टीसाठी तपासणी करण्यात आली. तपासणीच्या माध्यमातून संभाव्य आरोग्यविषयक जोखीम ओळखून त्यानुसार आवश्यक फिजिओथेरपीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नागरिकांना नियमित शारीरिक हालचाल, संतुलित व निरोगी जीवनशैली, पडणे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

शारीरिक कार्यक्षमता टिकवून ठेवणे, स्वावलंबन वाढविणे, पडण्याचा धोका कमी करणे आणि जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक व्यायाम व दैनंदिन काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.शिबिराचे आयोजन डॉ. पायल संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

डॉ. हितांशी शिंदे आणि डॉ. अथर्व यांनी शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. शिक्षकवृंद, निवासी डॉक्टर तसेच सहकार्य करणार्‍या सर्वांचे यावेळी आभार मानण्यात आले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button