CrimePolitics

हिंगोली हादरली! डिझेलअभावी रुग्णवाहिका नाकारल्याने नवजात बाळाचा मृत्यू ; संतप्त रोहिणी खडसेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, “हत्या कुणी केली?”

अडीच तास वेदना सहन करत मातेची मृत्यूशी झुंज; जळगावातून व्हिडिओ जारी करत ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी!

हिंगोली हादरली! डिझेलअभावी रुग्णवाहिका नाकारल्याने नवजात बाळाचा मृत्यू ; संतप्त रोहिणी खडसेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, “हत्या कुणी केली?”

अडीच तास वेदना सहन करत मातेची मृत्यूशी झुंज; जळगावातून व्हिडिओ जारी करत ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी!

जळगाव: प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे एका गरोदर मातेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे तिच्या पोटच्या निष्पाप बाळाला जीव गमवावा लागल्याची अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, १०२ आणि १०८ नंबरवर संपर्क करूनही ‘रुग्णवाहिकेत डिझेल नाही’ असे सांगत मदत नाकारण्यात आली. या गंभीर आणि संवेदनशील घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. “त्या नवजात बाळाची ही एका प्रकारची हत्याच असून, आता सांगा ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा?” असा संतप्त आणि धारदार सवाल खडसे यांनी थेट सरकारला विचारला आहे.

अडीच तासांचा तो काळ ठरला काळ!
मिळालेल्या माहितीनुसार, जवळा बाजार येथील एका गरोदर महिलेला प्रसूती कळा येत असल्याने ती प्रचंड वेदना सहन करत होती. तिच्या कुटुंबाने शासकीय नियमाप्रमाणे १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवेशी तातडीने संपर्क साधला. मात्र, ऐन आणीबाणीच्या वेळी प्रशासनाने डिझेल नसल्याचे कारण पुढे करत गाडी पाठवण्यास नकार दिला. तब्बल अडीच तास ती माता रुग्णवाहिकेची वाट पाहत तडफडत होती. वेळेत योग्य उपचार आणि रुग्णालय न मिळाल्यामुळे अखेर तिला तिचे बाळ गमवावे लागले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासकीय अनास्थेविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

“इंधनाचा तुटवडा नाही, मग बाळ का दगावले?”
रोहिणी खडसे यांनी जळगावातून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत थेट सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सत्ताधारी पक्षातील सर्व लोक छातीठोकपणे सांगत आहेत की राज्यात इंधनाची कोणतीही टंचाई नाही आणि पुरेसा साठा उपलब्ध आहे. मग असे असताना हिंगोलीत एका गरीब मातेला डिझेलअभावी रुग्णवाहिका का नाकारली गेली? मंत्र्यांचे दावे खरे की जमिनीवरील ” असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

गुन्हेगार कोण? खडसेंचे बोचरे प्रश्न
आपल्या व्हिडिओमध्ये पुढे बोलताना रोहिणी खडसे यांनी आरोग्य व्यवस्था आणि शासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. “या निष्पाप बाळाच्या मृत्यूला जबाबदार कोण? ते आरोग्य प्रशासन? रुग्णवाहिकेचे निष्काळजी कर्मचारी? की राज्यातील पेट्रोल-डिझेलची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरलेले हे सरकार?” असे प्रश्न त्यांनी विचारले. ही केवळ तांत्रिक चूक नसून प्रशासकीय हलगर्जीपणामुळे झालेली हत्याच आहे, त्यामुळे याप्रकरणी कडक कायदेशीर पावले उचलून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. या घटनेमुळे राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवेची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button