इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा ;अध्यक्षपदी रितू शर्मा तर सचिवपदी पायल जैन यांची निवड

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा
अध्यक्षपदी रितू शर्मा तर सचिवपदी पायल जैन यांची निवड
जळगाव : इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टचा सन २०२६-२७ या नवीन वर्षाचा पदग्रहण सोहळा ३० जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या नवीन कार्यकाळासाठी क्लबच्या अध्यक्षपदी रितू शर्मा यांची तर सचिवपदी पायल जैन यांची निवड करण्यात आली आहे. हा सोहळा गुरुवारी सायंकाळी ६ वाजता गणपती नगरातील रोटरी हॉल येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आयआयडब्ल्यू ट्रेझरर रश्मी शर्मा, जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे, पीडीसी संगीता घोडगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पदभार सोपवला जाईल. पदग्रहण सोहळ्यादरम्यान नवनिर्वाचित अध्यक्षा रितू शर्मा आणि सचिव पायल जैन यांच्यासह संपूर्ण नवीन कार्यकारिणी औपचारिकपणे सूत्रे हाती घेतील. याप्रसंगी आगामी वर्षात राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रकल्पांची घोषणा केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत यांसारख्या उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.







