Crime

नातीच्या लग्नासाठी दागिने न दिल्याने वृद्ध आईला मुलाकडून मारहाण

बोदवडमध्ये धक्कादायक घटना

नातीच्या लग्नासाठी दागिने न दिल्याने वृद्ध आईला मुलाकडून मारहाण

बोदवडमध्ये धक्कादायक घटना

बोदवड प्रतिनिधी

तालुक्यातील सुरवाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातीच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने दिले नाहीत, म्हणून पोटच्या मुलानेच वृद्ध आईला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी बोदवड पोलिसांनी मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल पंढरी कोळी (वय ७५, रा. सुरवाडा) या वृद्ध महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांचा मुलगा भगवान पंढरी कोळी हा त्याच गावात राहतो. मुलीच्या लग्नासाठी भगवान कोळी याने आईकडे कानातील बाही आणि मंगळसूत्र मागितले. मात्र, आईने दागिने देण्यास नकार दिल्याने तो संतप्त झाला.

यानंतर, भगवान कोळी आणि त्याची पत्नी बेबाबाई भगवान कोळी यांनी एकत्र येत वृद्ध आईला शिवीगाळ केली आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली. या घटनेत विमल कोळी गंभीर जखमी झाल्या.

वृद्ध महिलेने तत्काळ बोदवड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भगवान कोळी आणि त्याच्या पत्नीवर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विनोद श्रीनाथ करत आहेत.

या प्रकारामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, एका आईला मुलाकडून अशा प्रकारे मारहाण होण्याच्या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button