CrimeOther

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील ४ पोलीस निरीक्षकांची बदली, वाचा कोण कुठे जाणार?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली सुरूच असून बुधवार आणखी ४ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जारी केले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आज पुन्हा ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोनि पवन प्रतापराव देसले यांची धरणगांव येथून प्रभारी शहर वाहतुक शाखा, जळगांव, पोनि सुनिल हंसराज पवार यांची नियंत्रण कक्ष, जळगांव येथून प्रभारी धरणगांव, पोनि अनिल विठ्ठल भवारी यांची जळगाव शहर येथून चोपडा ग्रामिण, पोनि सागर सुरेश शिंपी यांची नियंत्रण कक्ष, जळगांव येथून प्रभारी जळगांव शहर येथे नेमणूक करण्यात आली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button