नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचे दराचा नवा उच्चांक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । नवरात्रोत्सवाची मंगल सुरुवात होताच सोने-चांदीच्या भावांनी नवा उच्चांक गाठला आहे. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार आजच्या बाजारभावांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, ग्राहकांचा खरेदीसाठी मोठा कल दिसून येत आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०२,३२०, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,११,७०० पर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, चांदीचा दर ₹१,३३,००० प्रति किलो झाला असून, उत्सवाच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांसाठी आणि दागिन्यांच्या खरेदीदारांसाठी हे दर ऐतिहासिक ठरले आहेत.
भंगाळे गोल्डमध्ये सध्या नवरात्रोत्सवी आकर्षक योजना आणि विशेष ऑफर्स सुरू असून, त्यामुळे ग्राहकांचा ओघ वाढला आहे. उत्सवी वातावरणात सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा जपण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी अनेक कुटुंबे भंगाळे गोल्ड दालनात मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील ग्राहकांनी विशेषत: दागिन्यांच्या नव्या डिझाईन्स आणि शुद्धतेच्या हमीसाठी भंगाळे गोल्डची निवड केली आहे.





