Crime

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास 3 वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास 3 वर्षे सश्रम कारावास

प्रतिनिधी | जळगाव दुकानात कुरकुरे आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन – मुलीस चाकूचा धाक दाखवून व धमकावून जबरदस्तीने दुचाकीवरून नेल्याप्रकरणी आरोपी प्रवीण सलतान चव्हाण (वय २२, रा. करगाव तांडा क्र. ४, ता. चाळीसगाव) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी.

बनकर यांनी तीन वर्षे सश्रम कारावास, दंडाची शिक्षा सुनावली. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक आशिष रोही यांनी दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले; पीडिता व तिच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची ठरली. विशेष सरकारी वकील अॅड. चारुलता बोरसे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button