अमळनेर हादरले : मुलाकडून हातोड्याने बापाचा खून

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर शहरातील शिरुड नाका, शिवाजी नगर परिसरात घरगुती वादातून एक धक्कादायक खूनाची घटना घडली आहे. वृद्ध राजेंद्र दत्तात्रय कासार (वय ६४) यांचा त्यांच्या मुलाने हातोड्याने वार करून खून केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण कासार हा दारूच्या नशेत असताना वडिलांशी वाद झाला. संतापाच्या भरात त्याने हातोड्याने डोक्यात, पोटावर आणि कंबरेखाली गंभीर वार केले. गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र कासार यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत राजेंद्र कासार हे यांना देखील दारूचे व्यसन असल्याने त्यावरूनच वडील-मुलामध्ये वाद वाढला आणि अखेर खूनाची ही घटना घडली.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम हे फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी पोहोचले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. घरी कुणीही नसताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.






