
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव येथून इंदौर मार्गे दिल्ली येथे जाण्यासाठी कनेक्टिंग फ्लाईट सेवा २ मे पासून सुरू होणार आहे.
ही सेवा आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध असणार असून Air Alliance (एअर अलायन्स) कंपनीकडून ती चालविण्यात येणार आहे.
उपलब्ध वेळापत्रकानुसार, दिल्लीहून इंदौरमार्गे जळगावला येणारी फ्लाईट सायंकाळी ४:५० वाजता दिल्लीहून सुटून ६:५० वाजता इंदौर येथे पोहोचेल. त्यानंतर ७:१५ वाजता इंदौरहून निघून ७:५५ वाजता जळगाव येथे आगमन होईल.
तसेच जळगावहून परतीच्या प्रवासासाठी फ्लाईट रात्री ८:२० वाजता जळगावहून सुटून ९:०० वाजता इंदौर येथे पोहोचेल. पुढे ९:२५ वाजता इंदौरहून निघून ११:३० वाजता दिल्ली येथे पोहोचणार आहे.
या नव्या कनेक्टिंग सेवेमुळे जळगाव जिल्ह्यातील व्यावसायिक, विद्यार्थी तसेच प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, थेट राष्ट्रीय राजधानीशी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे.






