Politics

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

जळगाव,  – जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. ८ ऑगस्ट २०२६ ही प्रगणना पत्र (EF) भरण्यासाठी मतदारांची अंतिम मुदत आहे.

या पार्श्वभूमीवर बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांनी घरोघरी भेटी देऊन गैरहजर, मयत, दुबार व स्थलांतरित (ASDD) मतदारांची यादी तयार केली आहे. या नावांचा समावेश दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे.

गैरहजर व स्थलांतरित मतदारांच्या याद्यांची तपासणी व पडताळणी करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीसंदर्भात संबंधित राजकीय पक्षांना पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.

तरी जळगाव शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन विनय गोसावी उपविभागीय अधिकारी, जळगाव तथा मतदान नोंदणी अधिकारी, १३-जळगाव विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.

ही बैठक केवळ १३-जळगाव विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित करण्यात आली असल्याचेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button