Crime

मेहरूण तलावात बुडालेल्या नदीमचा मृतदेह 17 तासानंतर सापडला 

मेहरूण तलावात बुडालेल्या नदीमचा मृतदेह 17 तासानंतर सापडला 

एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव (प्रतिनिधी) –शहरातील तांबापुरा भागात राहणाऱ्या 24 वर्षीय नदीम शेख याचा साथ जून रोजी दुपारी दोन वाजता मेहरून तलाव येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह शोधण्याचे शर्तीचे प्रयत्न केले होते मात्र आज रविवार आठ जून रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास नदीम शेख यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूच नोंद करण्यात आली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नदीम शेख हा शनिवारी बकरी ईदची सुट्टी असल्याने  मेहुणे अझहर खान, मामेभाऊ इरफान शेख, तोहीत खान आणि मित्र मोहसीन खान यांच्यासोबत मेहरुण तलाव परिसरात गेला होता. तापमान वाढल्याने सर्वजण तलावात आंघोळीसाठी उतरले. सुरुवातीला नदीम काठावर थांबला होता, मात्र काही वेळाने तोही पाण्यात उतरला आणि पोहत असताना अचानक खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. इतर मित्रांनी मदतीचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत नदीम पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस, महापालिका आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नातेवाईकांनी मदत कार्यात दिरंगाई झाल्याचा आरोप केला. शनिवारी रात्रीपर्यंत शोध सुरु होता, मात्र नदीमचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता. अखेर रविवारी (८ जून) सकाळी सात वाजता मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवला. यावेळी नातेवाईकांनी हंबरडा फोडत एकच आक्रोश केला. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनास्थळी आमदार सुरेश भोळे, तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह पोलीस व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button