Crime

जामनेर तालुक्यात तरुणांच्या आत्महत्यांचा चिंताजनक आकडा; चार वर्षांत १०८ मृत्यूंची नोंद

माहिती अधिकारातून आकडेवारी समोर; अधिकृत नोंदी आणि मागवलेल्या माहितीत तफावत असल्याचा दावा

जामनेर तालुक्यात तरुणांच्या आत्महत्यांचा चिंताजनक आकडा; चार वर्षांत १०८ मृत्यूंची नोंद

माहिती अधिकारातून आकडेवारी समोर; अधिकृत नोंदी आणि मागवलेल्या माहितीत तफावत असल्याचा दावा

जामनेर I महा पोलीस न्यूज  : जामनेर तालुक्यात तरुणांच्या आत्महत्यांची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. सन २०२३ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत १०८ तरुणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अविनाश बोरसे यांनी मागवलेल्या माहितीतून ही बाब उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आत्महत्यांच्या आकडेवारीत तफावत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत नोंदीनुसार, २०२३ मध्ये २२, २०२४ मध्ये २४, २०२५ मध्ये ३२ आणि २०२६ मध्ये ३० तरुणांच्या आत्महत्यांची नोंद आहे. या आकडेवारीनुसार चार वर्षांत एकूण १०८ आत्महत्यांची नोंद झाली आहे.

मात्र, अविनाश बोरसे यांनी मागवलेल्या माहितीनुसार, तरुणांच्या आत्महत्यांची संख्या अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही घटनांची नोंद झाली आहे की नाही, तसेच अधिकृत आकडेवारी आणि उपलब्ध माहितीत तफावत का आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

२०२४ ते २०२६ या तीन वर्षांत १३८ तरुणांच्या आत्महत्यांची आकडेवारी असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच २०२६ या एकाच वर्षात ६५ तरुणांनी आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे आकडे पोलिस प्रशासनाच्या अधिकृत नोंदीतील आकडेवारीशी जुळत नसल्याने नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.

तरुणांच्या आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करून या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर माहिती अधिकारातून प्राप्त झालेली आकडेवारी आणि पोलिसांच्या अधिकृत नोंदी यांची पडताळणी करून तफावतीबाबत स्पष्टता आणण्याची मागणी होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button