Crime

राष्ट्रीय महामार्गाच्या मोबदल्याप्रकरणी प्रकल्प संचालकांविरुद्ध अटक वॉरंट

४.७० लाखांची थकबाकी; न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न केल्याचा ठपका

राष्ट्रीय महामार्गाच्या मोबदल्याप्रकरणी प्रकल्प संचालकांविरुद्ध अटक वॉरंट

४.७० लाखांची थकबाकी; न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न केल्याचा ठपका

जळगाव : राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याप्रकरणी जळगाव येथील सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचा आदेश दिला आहे. एरंडोल येथील शेतकरी नितीन राठी यांच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यापोटी ४ लाख ७० हजार ८९२ रुपये देय असताना, वारंवार संधी देऊनही न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या कामासाठी २०१३ मध्ये नितीन राठी यांची जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा वाढीव मोबदला म्हणून ४ लाख ७० हजार ८९२ रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देणे बाकी होते. मात्र, वारंवार संधी देऊनही संबंधित रक्कम अदा करण्यात आली नाही.

या प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेत प्रकल्प संचालकांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाणीवपूर्वक न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचा ठपकाही आदेशात ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात शेतकरी नितीन राठी यांच्यातर्फे ॲड. राहुल नारायण लाठी यांनी काम पाहिले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button