Crime

आश्रमशाळेतील ७ वर्षीय विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू 

अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील घटना

अमळनेर :-पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका सात वर्षीय बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील पिंगळवाडे येथे 30 रोजी घडली याप्रकरणी अकस्मात स्मृतीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की,पिंगळवाडे येथील आश्रमशाळेत सायंकाळची हजेरी घेताना पहिलीचा विद्यार्थी पंकज जमादार वळवी (वय ७ वर्ष) रा. केलीपाणी ता. तळोदा जि. नंदुरबार हा दिसत नसल्याचे लक्षात आल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी सदर मुलगा शाळेच्या बाजूला असलेल्या अतुल शरद पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे लक्षात आले.

त्याचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची खात्री झाली. पोलिसांना याबाबत माहिती देऊन ग्रामस्थांनी खाटेला दोर बांधून विद्यार्थ्यांचा मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी भरत कोळी याच्या फिर्यादीवरुन मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर करीत आहे.हे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button