EducationHealth

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जलविद्युत प्रकल्पांवर तांत्रिक व्याख्यान

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जलविद्युत प्रकल्पांवर तांत्रिक व्याख्यान

जलविद्युत निर्मिती, पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञानासह ईएओसेक्शन, चाचणी आणि कार्यान्वयन प्रक्रियेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव – गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव येथील विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी जलविद्युत प्रकल्पांवर विशेष तांत्रिक व्याख्यान संपन्न झाले. यावेळी जलविद्युत निर्मिती, पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञानासह ईएओसेक्शन, चाचणी आणि कार्यान्वयन प्रक्रियेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता (विद्युत) भारत मार्तंड बर्‍हाटे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील ३७ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून बर्‍हाटे यांनी विद्यार्थ्यांना पारंपारिक जलविद्युत तसेच पंप-स्टोरेज जलविद्युत प्रकल्प ची कार्यपद्धती, रचना आणि अभियांत्रिकी संकल्पना,जलविद्युत प्रकल्प उभारणी, चाचणी, कार्यान्वयन आणि हस्तांतरण, मिनी, मायक्रो आणि लघु जलविद्युत प्रकल्पांची रचना, प्रकल्प क्षमता निश्चिती, विविध विद्युत व यांत्रिक उपकरणांची उभारणी, तपासणी व देखभाल तसेच उपसा सिंचन योजना मधील विद्युत कामकाज याबाबतही त्यांनी माहिती दिली.

पंप-स्टोरेज योजनेतील रिव्हर्सिबल मशीन ची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पांच्या उदाहरणांसह स्पष्ट केली.कोयना जलविद्युत प्रकल्प आणि घाटघर पंप स्टोरेज योजना (२ ÷ १२५ मेगावॅट) यांसारख्या प्रकल्पांतील अनुभव विद्यार्थ्यांना तांत्रिक संकल्पना व्यावहारिक पद्धतीने समजावून दिल्या. छायाचित्रे व व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून प्रकल्पातील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती देण्यात आली. यावेळी बर्‍हाट यांचेसोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व डिप्लोमा समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांनी मार्गदर्शन केले. आयोजन प्रा. वैभव झांबरे व अकॅडमिक डीन प्रा. एन. सी. पाटील यांनी केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button