Other

आमदार राजूमामांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जळगाव शहरातील प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी निधीस मंजुरी

आमदार राजूमामांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जळगाव शहरातील प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी निधीस मंजुरी

जळगाव प्रतिनिधी शहरातील रस्ते सुरक्षित, सुशोभित व आधुनिक करण्याच्या उद्देशाने आमदार मा. श्री. सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्ष अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, जळगावच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामधून जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिवे उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.
सदर मंजुरीमुळे अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यात येणार असून, या मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होईल. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, नागरिक तसेच विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. याशिवाय शहराच्या सौंदर्यातही लक्षणीय वाढ होणार आहे.
या कामासाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. या प्रस्तावास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील व मा. मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजुरीची प्रक्रिया गतीने पूर्ण झाली.
यावेळी आमदार राजूमामा यांनी या विकासकामासाठी सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, मा. मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन, मा. मंत्री श्री. संजय सावकारे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
याबाबत आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, “जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांसाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आगामी काळातही शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून आणण्याचा प्रयत्न सुरू राहील. नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

आमदार सुरेश दामु भोळे (राजुमामा)
यांचे जनसंपर्क कार्यालय, जळगांव

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button