प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती सप्ताह उत्साहात साजरा


प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती सप्ताह उत्साहात साजरा
चोपडा : प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जयंती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
या सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि स्वदेशीचे विचार रुजवण्यासाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी भाषण, चित्रकला, रंगभरण आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन केले.
भाषण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचे जीवनकार्य, त्यांचे विचार, सत्य व अहिंसेचे महत्त्व तसेच आजच्या जीवनातील गांधीवादी तत्त्वांची उपयुक्तता यावर आपले विचार मांडले. चित्रकला व रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनाशी संबंधित विविध चित्रे रेखाटली.विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, स्वच्छतेची जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश होता.
शाळेचे मुख्याध्याप क रजिशसर, उपमुख्याध्यापिका निखिला मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका अश्विथी व सर्व शिक्षकांनी या उपक्रमांचे यशस्वी नियोजन केले.
तसेच रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘सत्य आणि अहिंसा’, ‘स्वच्छ भारत’ आणि ‘स्वदेशी’ या विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारून सामाजिक संदेश दिले.
रांगोळी स्पर्धेत मा. मुख्याध्यापक सर, मा. निखिला मॅडम व मा. मीनल पाटील मॅडम यांनी रांगोळी परीक्षण केले. स्पर्धेत लहान गटातून प्रथम क्रमांक शांती ग्रुप मार्गदर्शन सौ.भावना पाटील , द्वितीय क्रमांक स्वदेशी ग्रुप मार्गदर्शन सौ. प्रिंयका शिंदे ,तृतीय क्रमांक सत्याग्रह ग्रुप मार्गदर्शक मुस्कान पठान टीचर तसेच मोठ्या गटातून प्रथम क्रमांक स्वराज्य ग्रुप मार्गदर्शन सौ. चेतना बडगुजर ,द्वितीय क्रमांक अहिंसा ग्रुप मार्गदर्शन सौ. प्रतिभा सोनवणे ,तृतीय क्रमांक खादी ग्रुप शेख सर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.







