Politics

NEET पेपरफुटी प्रकरणी बुधवारी महाविकास आघाडीच्या युवक संघटनांचे तीव्र आंदोलन

एम. जे. कॉलेजसमोर होणार निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

NEET पेपरफुटी प्रकरणी बुधवारी महाविकास आघाडीच्या युवक संघटनांचे तीव्र आंदोलन

एम. जे. कॉलेजसमोर होणार निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

जळगाव l प्रतिनिधी NEET पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या एका महिला प्राध्यापिकेला अटक झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील युवासेना, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने बुधवार, दि. २० मे रोजी सकाळी ११ वाजता एम. जे. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिला प्राध्यापिकेसह इतर व्यक्ती किंवा संघटित रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

युवक संघटनांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येत असून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींवर कठोर आणि निष्पक्ष कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवासेनेचे विराज कावडीया, निलेश चौधरी, पियुष गांधी, प्रितम शिंदे, युवक काँग्रेसचे मुजीब पटेल तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विनायक पाटील आणि रिकु चौधरी यांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button